Your cart is currently empty!
ISBN: 978-81-991103-3-5
लेखक : विद्यावाचस्पती विद्यानंद
या ग्रंथाच्या रचनेमागील प्रेरणा ही केवळ सैद्धांतिक चिंतनाची फलश्रुती नसून, ती एक अनुभवी साधकाचे अंतर्मनातून आलेले मौन भाष्य आहे. “प्रपंच आणि परमार्थ” हा ग्रंथ म्हणजे एक अशी साधनामय वाटचाल आहे; जी गृहस्थी जीवन जगत असतानादेखील अंतर्मनाच्या परमार्थी क्षेत्रात पावले रोवण्याचे सामर्थ्य जागवते.
ISBN: 978-81-991103-3-5
लेखक : विद्यावाचस्पती विद्यानंद
आजच्या काळातील साधक ही केवळ एका बाजूने अध्यात्माकडे झुकणारी व्यक्ती नाही; तर तो एक कर्तव्यनिष्ठ, नात्यांमध्ये गुंतलेला, आर्थिक, सामाजिक जबाबदाऱ्यांनी वेढलेला आणि तरीही अंतर्मुखतेसाठी आसुसलेला जीव आहे. ह्याच वास्तवाच्या पाश्र्वभूमीवर ह्या ग्रंथाची निर्मिती झाली आहे.
या ग्रंथाचे प्रमुख वैशिष्ट्य हे आहे की, यामध्ये गृहस्थाश्रमाच्या प्रत्येक पातळीवरून परमार्थाकडे कसे सहजगत्या जाणे शक्य आहे; हे विस्तारपूर्वक आणि अत्यंत सुसंगतरीत्या स्पष्ट केले आहे. जगाच्या कोलाहलात हरवलेला माणूस साधनेचा मार्ग शोधत असताना एकतर पूर्ण जगत्याग करतो, किंवा प्रपंचात इतका गुंततो की त्याला परमार्थ म्हणजे एक दूरची, अशक्य कल्पना वाटू लागते. परंतु हा ग्रंथ सांगतो की, प्रपंच आणि परमार्थ ही द्वैते नाहीत; तर ती एकमेकांच्या पूर्तता आणि पूर्णता करणारी दोन रूपं आहेत.
“प्रपंच आणि परमार्थ” या ग्रंथात श्रीसद्गुरुतत्त्वाचे अधिष्ठान ही एक केंद्रीय शक्ती म्हणून अवतरलेली आहे. कारण गुरुकृपेची उपस्थिती हीच त्या सूक्ष्म मार्गदर्शनाची दिशा आहे; जी साधकाला आपले जीवन कसे जगावे; हे केवळ सांगत नाही तर त्या जीवनात ईश्वराची अनुभूती निर्माण करून देते. गुरू म्हणजे अध्यात्माचे जीवनशास्त्र ज्याच्या आधारावर प्रपंच ही एक तपश्चर्या ठरते आणि परमार्थ ही तिची फलश्रुती होते.
Reviews
There are no reviews yet.