आर्थिक साक्षरता आणि गुंतवणूक

Original price was: ₹400.00.Current price is: ₹380.00.

आर्थिक साक्षरता आणि गुंतवणूक

ISBN: 978-81-982283-2-1

लेखक : विद्यावाचस्पती विद्यानंद

“आर्थिक साक्षरता आणि गुंतवणूक” या ग्रंथाची रचना म्हणजे जीवनाच्या विविध आर्थिक टप्प्यांचा समतोल प्रवास आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी बचतीची सवय, तरुणांसाठी गुंतवणुकीची समज, कामकाज करणाऱ्यांसाठी जोखमीचे व्यवस्थापन, आणि निवृत्त व्यक्तींना स्थिर उत्पन्नाची योजना’ या सर्वांमध्ये हा ग्रंथ एक सहज दुआ निर्माण करतं. यामध्ये कुठेही विद्वत्तेचा आढा न घेत, अतिशय मोकळेपणाने, आपल्या भाषेत, आपल्यासारख्याच लोकांसाठी लिहिलेला हा प्रामाणिक प्रयोग आहे.

Category:

Description

आर्थिक साक्षरता आणि गुंतवणूक

ISBN: 978-81-982283-2-1

लेखक : विद्यावाचस्पती विद्यानंद

“आर्थिक साक्षरता आणि गुंतवणूक” या ग्रंथाचा उद्देश केवळ आर्थिक माहिती देणे हा मर्यादित नसून, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आर्थिक जीवनात जागरूक, सक्षम आणि स्वावलंबी बनवणे हाच या ग्रंथाचा केंद्रबिंदू आहे. आपल्या देशात शिक्षणाची गंगा वेगाने वाहते आहे, पण आर्थिक शहाणपण मात्र अजूनही अनेकांच्या दृष्टीने फक्त गणिताचा, बँकेचा किंवा श्रीमंतांचा विषय मानला जातो.

अगदी साधा नोकरदार, शेतकरी, गृहिणी, विद्यार्थी, व्यापारी, उद्योजक किंवा निवृत्त व्यक्तीसुद्धा, प्रत्येकाला आर्थिक जगतात योग्य निर्णय घेण्यासाठी एका स्पष्ट मार्गदर्शकाची गरज असते. हा ग्रंथ हीच गरज पूर्ण करण्यासाठी रचलेला आहे. या ग्रंथात आर्थिक साक्षरतेचा अर्थ, त्याची गरज आणि आजच्या बदलत्या जीवनशैलीत तिचे स्थान याबाबत सखोल विचार मांडले आहेत. बचत, खर्चाचे नियोजन, विमा, पेन्शन, गुंतवणुकीचे प्रकार, त्यांची जोखीम, परतावा आणि योग्य निर्णय घेण्यासाठी लागणारी मानसिकता हे सारे विषय अगदी सोप्या, समजण्याजोग्या आणि व्यवहार्य भाषेत मांडले आहेत.

यातून केवळ माहिती नव्हे, तर प्रत्येक वाचकाला आत्मपरीक्षण करायला आणि कृतीशील होण्याची प्रेरणा मिळावी असा उद्देश आहे. आजचा काळ आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने पाऊल टाकणारा आहे, आणि म्हणूनच आर्थिक साक्षरता ही काळाची गरज बनली आहे. पैसा हा आयुष्याचा हेतू नसतो, पण त्याचे योग्य नियोजन नसेल, तर तो आयुष्यावर नियंत्रण मिळवतो; हे वास्तव समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. या ग्रंथाच्या माध्यमातून ‘पैशावर आपलं नियंत्रण’ मिळवण्याची मानसिकता विकसित व्हावी, ही या ग्रंथामागची प्रेरणा आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आर्थिक साक्षरता आणि गुंतवणूक”

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Products