मानसशास्त्रीय गृहसजावट

Original price was: ₹400.00.Current price is: ₹380.00.

मानसशास्त्रीय गृहसजावट

ISBN: 978-81-991103-2-8

लेखक : विद्यावाचस्पती विद्यानंद

“मानसशास्त्रीय गृहसजावट” हा ग्रंथ आधुनिक काळातील घराच्या संकल्पनेला एक नवा आणि शास्त्रीय दृष्टिकोन देतो. घर ही केवळ वास्तू नसून ती प्रत्येक सदस्याच्या मानसिक प्रवृत्तींचे, भावनिक गरजांचे आणि सामाजिक नातेसंबंधांचे प्रतिबिंब असते. गृहसजावट ही सर्वसामान्यपणे सौंदर्य, अलंकरण किंवा आकर्षकता यापुरती मर्यादित मानली जाते; परंतु या ग्रंथाचा उद्देश गृहसजावटीकडे एक व्यापक आणि सखोल दृष्टीकोनातून पाहणे आहे; ज्यात मानसशास्त्र, उपयुक्तता आणि सौंदर्य या तीनही घटकांचा संगम साधला आहे.

Category:

Description

मानसशास्त्रीय गृहसजावट

ISBN: 978-81-991103-2-8

लेखक : विद्यावाचस्पती विद्यानंद

मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून प्रत्येक कुटुंब सदस्याच्या वैयक्तिक गरजा, वयानुसार बदलणाऱ्या अपेक्षा, कार्यक्षेत्रातील आवश्यक ऊर्जा, भावनिक आधार, सामाजिक नाते आणि विश्रांतीसाठीची मानसिक शांती यांचा सखोल विचार करून गृहसजावटीचा पाया रचला पाहिजे. या ग्रंथात घराच्या प्रत्येक खोलीचा, सामूहिक आणि वैयक्तिक क्षेत्रांचा, रंग, प्रकाश, ध्वनी, मांडणी आणि वापर यांचा मानसशास्त्रीय परिणाम सविस्तरपणे विवेचित केला आहे.

या ग्रंथाचे वैशिष्ट्य असे, की यात केवळ वास्तुशिल्पीय किंवा सौंदर्यात्मक मांडणी नाही; तर प्रत्येक सजावटीचा थेट मानसिक परिणाम आणि त्यातून घडणारा जीवनगुणवत्तेचा विकास स्पष्ट केला आहे. घरातील बैठकखोली सामूहिक संवादासाठी, शयनकक्ष मानसिक विश्रांतीसाठी, स्वयंपाकघर ऊर्जेसाठी, अभ्यासकक्ष एकाग्रतेसाठी; तर मुलांचे आणि ज्येष्ठांचे क्षेत्र त्यांच्या मानसिक गरजांसाठी कसे महत्त्वाचे आहे; याची शास्त्रीय मांडणी येथे केलेली आहे. या सर्वांचे विवेचन करताना सौंदर्य तसेच उपयुक्तता यांचे संतुलन कसे साधावे आणि ते संतुलन कुटुंबातील मानसिक आरोग्याशी कसे थेट जोडलेले आहे; यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.

गृहसजावटीच्या पारंपरिक कल्पना आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा योग्य समन्वय कसा साधावा, बदलत्या जीवनशैलीनुसार घराची सजावट कशी सातत्यपूर्णपणे विकसित व्हावी आणि पर्यावरणपूरक दृष्टिकोनातून घराला मानसिक शांती त्याचबरोबर दीर्घकालीन स्थैर्य कसे मिळावे; यावर या ग्रंथात विस्तृत चर्चा केली आहे. घरातील प्रत्येक घटक; रंगसंगती, प्रकाशयोजना, फर्निचरची मांडणी, भिंतींचे स्पर्श आणि ध्वनी यांचा परिणाम केवळ बाह्य सौंदर्यावर होत नाही; तर तो थेट मनाच्या स्थितीवर प्रतिबिंबित होतो. हे प्रतिबिंब अधिक संतुलित, समरस आणि आरोग्यपूर्ण ठेवण्यासाठी मानसशास्त्रीय गृहसजावट ही एक शास्त्रशुद्ध आणि कलात्मक प्रक्रिया आहे; हे या ग्रंथातून अधोरेखित केलेले आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मानसशास्त्रीय गृहसजावट”

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Products