गुरुकृपा आणि आत्मबोध

Original price was: ₹400.00.Current price is: ₹360.00.

लेखक : विद्यावाचस्पती विद्यानंद

ISBN: 978-8-19822-833-8

“गुरुकृपा आणि आत्मबोध” हा ग्रंथ कोणत्याही धार्मिक परंपरेशी बांधील न राहता, परंतु सर्व धर्मांतर्गत गुरुतत्त्वाचे सार हृदयात घेऊन रचलेला एक सखोल आध्यात्मिक चिंतनगर्भ ग्रंथ आहे. हा ग्रंथ एकाच वेळी श्रद्धा, विवेक आणि अनुभूती यांचा समन्वय साधतो. हा ग्रंथ केवळ वाचनासाठी नाही, तर अनुभूतीसाठी आणि अंतर्मुख होण्यासाठी आहे.

हा ग्रंथ अध्यायनिहाय स्पष्ट, विचारसंपन्न आणि मन:पूर्वक सादर करण्यात आला आहे. प्रत्येक अध्यायात गुरुतत्त्वाचे एक अंग घेतले आहे आणि ते सखोलतेने, परंतु सहजतेने उलगडले आहे.

 

Category:

Description

गुरुकृपा आणि आत्मबोध

लेखक : विद्यावाचस्पती विद्यानंद

ISBN: 978-8-19822-833-8

गुरूकृपा ही यंत्रणेमुळे प्राप्त होणारी कृती नाही; ती निर्भरता, समर्पण आणि निःस्वार्थ सेवेमधून साधकाच्या अंत:करणात झऱ्यासारखी प्रकट होते. ही कृपा आपल्या साधनेस गतिशीलता देते. पण ही कृपा मिळवण्याआधी साधकाला त्याचे अंतरंग तयार करावे लागते. हेच ‘कृपेचे पात्रत्व’ या संकल्पनेद्वारे स्पष्ट केले आहे.

या ग्रंथाचा अंतिम उद्देश आहे, तो म्हणजे आत्मबोधाची प्रबुद्धता साधणे. गुरू म्हणजे केवळ बाह्य शिक्षक नव्हेत, तर अंतर्मनातील प्रकाशदूत आहेत. त्यांच्या कृपेने जेव्हा साधकाचा अहं विरघळतो; तेव्हा आत्म्याचे स्वरूप प्रकट होते. हे प्रकट स्वरूपच आत्मबोध आहे. पण आत्मबोध म्हणजे केवळ तत्वज्ञान नव्हे; तर एक जागृत अवस्था आहे. त्यासाठी गुरूकृपा आवश्यक आहे आणि गुरूकृपेकरिता गुरूभक्ती, सेवा, विश्वास, समर्पण आणि नितांत शुद्ध अंतःकरण हे साधकाच्या अंगी असावे लागते; हीच या ग्रंथाची अंत:प्रवाह असलेली धारा आहे.

 

Related Products